top of page
Writer's pictureDr.Ramesh Suryawanshi

हिंदुत्ववादी अंधभक्तांना नम्र निवेदन

सगळे भक्त आणि आंधळे हिंदू प्रेम यांना नम्र विनंती. आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये माझं नाव असेल. तर ते डिलीट करा मला ब्लॉक करा माझ्या कोणत्याही पोस्ट कॉमेंट्स तुम्हाला दिसणार नाहीत अशीही व्यवस्था करा. त्यामुळे तुमच्या पोस्टला मी कॉमेंट करण्याचा संबंध राहणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल अंधश्रद्धा विरोधात किंवा आपल्या वरिष्ठ नेत्याच्या विरोधात कुठलीही कॉमेंट यायला नको. तर आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये केवळ आपलं कुटुंबच ठेवा. बाकीच्यांना ठेवू नका. फेसबुक व्हाट्सअप सार्वजनिक आहे. फुकट आहे ती कुणाची खाजगी मालमत्ता नाही. सर्वांची मतमतांतरे तिथे ऐकावी लागतात. पहावी लागतात.ते आपणाला सहन होत नाही.अंधभक्ती मुळे आणि त्यामुळे आपण उगाच तुमचा पानशे करू मुरमू करू किंवा दाभोकर करू अशा धमक्या देण्यात काही अर्थ नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना मते मतं तर मांडण्याचा अधिकार आहे. मी एक शिक्षक आहे. मला समाजात जे जे वाईट दिसेल त्यावर मी टीका टिप्पणी करणार जे दुरुस्त करण्यासारखा आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार. शिक्षक या नात्याने माझ्या वर्गात सर्व जाती-धर्माचे पंथाचे विद्यार्थी होते त्यामुळे मला सर्वच जाती धर्माचे पंथाचे लोकप्रिय आहेत. मग तुम्ही हिंदू नाही का ! मुसलमान व्हा ! अशा धमक्या देऊ नका. राज्य हिंदू राष्ट्र बनवण्याची संकल्पना किंवा नको त्या लोकांना मोठं करायचं आणि मोठ्या लोकांना लहान करायचं या सगळ्या गोष्टी मनाला न पडणारे आहेत. त्यामुळे माझ्याकडून टीकाटिपणी होणारच. आपणाला सहन होत नाही आपण मला ब्लॉक करा आणि अनफ्रेंड करा. जे अभ्यासू आहेत,सर्व समाजाला घेऊन चालतात, भक्तांचा बुरखा फाडतात, ज्यांना मुसलमानांची अजिबात एलर्जी नाही अशांच्या पोस्ट मी शेअर करणार.त्यावर कॉमेंट करणार. जे आवडलं ते मी शेअर करणार. मग आपल्या पोस्टवर कोणीच कॉमेंट करू नये असं वाटत असेल, तर आपण सर्वांना ब्लॉक करा. फेसबुक इंटरनेट किंवा मीडिया केवळ आपणासाठी , आपल्या भक्तांसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी नाही हे लक्षात घ्या. काल सुषमा अंधारे यांच्या पोस्ट, पत्रकार परिषदेचा कौतुक केलं तर मला दोन धमक्या आल्यात. तिथे येऊ का? दाखवू का ? अशा प्रकारच्या धमक्या आल्या! सहन होत नाही त्याला एकच इलाज आहे अनफ्रेंड करा, ब्लॉक करा. धमकी देण्याची गरजच नाही. जरी आपणाला वरून आदेश असेल तरी आपल्या स्वतःचा वैयक्तिक धोरण राबवा. स्वतःही डोक्याला ताण करून घेऊ नका.आणि इतरांनाही ताण देऊ नका.


8 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

コメント


bottom of page