top of page
Writer's pictureDr.Ramesh Suryawanshi

तिस-या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केलेले हे अध्यक्षीय भाषण

Updated: Dec 14, 2022

आता आहे डिसे २०२२ हे भाषण केले आहे २५ मार्च २००० रोजी हे चाळीसगांव येथे पार पडलेल्या तिस-या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केलेले हे अध्यक्षीय भाषण आहे आज सुमारे बाविस वर्षांनंतरही त्यातील किती मुद्दे कालबाह्य झालेत अन किती आजही जसेच्या तसे आहेत हे पडताळून पहाता येतील चाळीसगांव संमेलनात केलेले व वृत्तपत्रांनी छापलेले संमेलनाध्यक्ष डाॅ रमेश सूर्यवंशी याचे मूळ भाषण चाईसगांव नगरीम्हा जमेल बठ्ठा माय बाप अन भाउ बहिनीस्वन आज समदाझन या तिसरा संमेलनना उच्छावसाटे मोठा हासीखुसीमान, धावत पयत उनात अन अहिरणी मायनी सेवा करानं पुन पदरम्हा पाडी ल्ही -हायनात येनसाटे मी मनपासीन तुम्हनं स्वागत करस. आजना जो दिन उगना तो जयगावना प्रा वसंत चव्हाण भाऊ मुयेच तेस्नी तेस्ना पेपरना वर्धापन दिनसाटे पैल्हं अहिराणी साहित्य संमेलन मांडय या गावमा ल्हीदं अन अहिरानीना पो-हेस्ले तेस्ना मायकडे दखाले भाग पाडं. दुसरे कासाराले झायं आन आते हाई चाईसगांवमां आते आसं सुरुच -हाई. आन हाई आहिरानी बठ्ठा दुनियाले माह्यती हूई आन हाई आसच चालू -हायनं की मंग तीले इंटरनेटवरबी जानं पडी इ मेल नं अहिरानी नागपेट आमरिकाम्हातला भाऊलेबी जाई एकझननी माले इचारं, कारेऽ भेा ऽ ह्या इंटरनेटना जमानामान तुन्हा आहिरानीनं काय काम से? मी त्याले म्हन्तं, आपू पैल्हे मायनं नाव ल्हेतस, मंग बापनं! कव्हय बी आपू मायबाप आसच म्हनंतस. बाप माय आसं कोन्ही म्हनंस का ? माय से म्हनीसन आपूनले हाई दुनिया दिखनी तसच अहिरानी माय व्हती म्हनीसन आपूनले हाई खरी दुनिया दिखनी तिन्हा लाडकोडम्हा आपलं धाकलपन गय ,तिन्ही दैना आते थंबाडा ! अहिरानी पैल्हे जलमनी मंग मराठी ः- पैल्हे आपली अहिरानी, व-हाडी, घाटोई, भिली, हा येयेल सेतीस मंग मराठी उनी. पैदा व्हताच प्रमाण मराठी कोन्हीच बोली नै व्हती. समदास्न बोलनं येरमेरले समजवा म्हनीसन एक प्रमाण भाषा तयार करी. अहिराणी, व-हाडी या ख-या भाषा ! समदास्ले समजी, सईन हूई आसा सबद, आसं व्याकरन समदासमाहीन जरा जरा ल्हीसन हाई स्टॅण्डर्ड मराठी तयार व्हयेल से. म्हनीसन अहिरानी, व-हाडी या मराठीन्या बोलीसेतस हाऊ सिद्धांत आते उल्टा करा. मराठी हाई माय नै ,तं ती या स्मदांस्नी लेक से, आन्डेर से. मराठी हाई समदास्ले समजवा म्हनीसन तयार करेल से. तीन्हं व्याकरन मांड, नियम बनाडात अन तसंच कटबन लिखाना नेम बनाडी दिधात. अन तसाच पुस्तके छापाले सुरवात झायी. कोन्तीबी प्रमाण भाषानं आसच -हास . स्टॅण्डर्ड इग्लीश नं बी आसच से. स्टॅण्डर्ड हाई कोन्ही बोली नै -हास. तरीबी आपू बोलीभाषाना खानामान मातृभाषा मराठी आसच लिखतस. कारन आपू स्टॅण्डर्ड सेतस ना ऽ. या खेाटा स्टॅण्डर्डना पाय-हे, आन पुना मंबईवालास्न सांगनं आपू आपला आहिरानी मायले गावठी, गावंढय म्हनाले लागनूत. दुनियाम्हातला कोन्ताबी भाषावैज्ञानिक कोन्तीबी बोलीले गावंढय, गावठी म्हनत नै. कारन कोनतीच बोली हाई गावंढय -हात नै अहिर अन खानदेसी ः- मराठीना पैल्हे अहिरानी पैदा व्हयेल से अहिराणी हाई अहिरेस्नी वाणी ,अहिरेस्नी बोली आभिर हा महाभारतमा बी व्हतात चौथा सतक पासीन त्या खानदेसम्हा सेतस तेन्हा पैल्हे त्या सिंध, सौराष्ट्र, राजस्थान आसं गच्ची भटकी उनात मातर तेस्नी आपली अहिरानी बोली सोडी नै आपू मुंबईले जातस तरी आपली भाषा बदली जास मंग त्या अहिर तं गच्ची भटकी उनात! मंग तेस्ना बोलीवर तं परिनाम व्हवाउच से ! मातर इतका सतक जाईसन बी ती आज टिकेल से येन्हा अर्थ तिन्हामान काही तरी दम से म्हनीसनच ना ? आभिर देसना उल्लेक महाभारत, सभापर्व, बृहतसcहbता, मत्स्यपुरान, वायुपुरान येस्ना म्हजार येयेल से तेन्ह इतिहासमां टिपनबी व्हयेल से अहिरेस्ना जसा इतिहास से तसा खानदेसनाबी इतिहास से खानदेसले ऋषिकदेस, आसिक, आष्मक, स्कंददेस, आभिरदेस, सेउन देस, खांडव देस, कानदेस, कान्हदेस, कन्नदेस, आसा गंजच नावेस्ना इतिहास से परतेक नावनी बी उपपत्ती इदवानेस्नी मांडेल से या इदवानेस्मान आपूनले राजवाडे,दा गो बोरसे, भा रं कुलकAणी, डाॅ केतकर,डाॅ श बा जोशी, नारखेडे, बाय बी पाटील, वि गो पांडे, चांदोरकर, सु बा कुलकणीऀ, डाॅ मोरवंचीकर, डाॅ पी डी जगताप, डाॅ तोताराम चोपडे, डाॅ अनिल सहस्त्रबुद्धे, डाॅ शामराव सूर्यवंशी,पांडूरंग जोशी, राजा महाजन, पुरुषेात्तम पाटील,डाॅ शंकर आन्ना साळी, डाॅ जवाहर मुथा, डाॅ विश्वास पाटील,डाॅ सयाजी पगार, सतीषचंद्र कुळकणीऀ, डाॅ प्रभाकर जाशी, प्रा प्रकाश तांबटकर, त ग बिरदडे,सरोजीनी बाबर, गजमल माळी, डाॅ श्रीपाल सबनिस, डाॅ विजया चिटणीस, डाॅ सऺजिवकुमार सोनवणे, डाॅ शकुंतला चव्हाण, स सो सुतार, डाॅ सुधीर देवरे, प्रकाश देवगांवकर, रमेश डी चव्हाण,शं क कापडनिस, नारायण सिरसाळे, कवि सुरेष, डाॅ कैलास सावेऀकर, सुभाष अहिरे, सुभद्रा चौधरी, येस्ना सारका आझून बराच झनेस्नी यादी मांडता येई. इतला झनेस्नी अहिरानी आन खानदेस येन्हा इतिहासवर तेस्ना भासनमा, तेस्ना लिखानमा, तेसना पुस्तकेस्मा ये वखतले मांडेल से. म्हनीसन मी आठे तेच तेच दयत बठीसन तुम्हले कटाई टाकत नै. खानना देस ( खाणीचा ) तो खानदेस ः- पन तुम्ही माले बोलानं निवतं दिन्हच तं मी बी काही मुददानी गोट सांगीच टाकस . खानदेसन्या आदलोग ज्या उपपत्त्या सांग्यात जशा खानना देस, कानबाईना देस, कान्हाना देस तस माले वाटस आपला देस खानदेस हाउ तापीनं खेारं, तथा सातपूडाना डोंगर, आथा विंध्याद्री जेले आपू अजिंठाना डोगर म्हनतस तो से, तिकडे चांदवडना डोंगर, या खोल खड्डाना भाग,हाउ खानदेस आसा खान, खदान खड्डा साठे खान हाउ सबद संस्कृत, पा्रकृत, सिंधी, बंगाली, कानडी, गुजराती, मराठी या समदा बोलीस्मान से. म्हनीसन हाई भलीमोठी खानना, खदानना देस तो खानदेस. दुसरी गोट आसी से फारसीमानं गवत ले 'काह' अन सुकेल गवतले , जंगलले 'कानन' आसं म्हनतस आपला या खानदेसना खदानमां, खानमां गवतले काय कमी ? आठे जंगलच व्हतं अन गवतच व्हतं म्हनीसन कान, काननना देस तो कानदेस- खानदेस आस बी नाव झायं आसी. तिसरी गोट या डोगरेस्ना म्हजारना भागम्हातल्या नद्यांस्वरी, गायना माटीवरी ,पैल्हे मोप पिके, म्हन्जे हाई पाणी, ढोरे, गवत, आनपानी येस्नी हाई खानच व्हती. तसा हाऊ खानदेस - खानना देस . आन्खी खान म्हन्जे वंश- जातकुई ! आठे या खदान मां जे जे व्हतं ते ते सुद्द, बिगर भेसयनं व्हतं . आठलं खान म्हन्जे - आगार, मोप साठा. हाउ खानदानी, चांगली खाननाच व्हता . जठे चांगली खान तो खानना देस- खानदेस. वर ज्या समदा इदवानेस्नी उपपत्या सांग्यात तेस्नी या गोस्टीस्नाबी इचार करावा . खानदेशी अन अहिरानीः- अहिर- आभिर येस्ना बाबत आझूनबी इदवानेस्मान वादच से कोन्ही म्हनस त्या आर्य सेतच तं कोन्ही म्हनस त्या अनार्य सेतस तर काही म्हनथ्स त्या शूद सेतस, म्लेच्छ सेतस. मी तं सांगी टाकं की त्या खानदानी- चांगली खानना व्हतात. पन आझूनबी इदवानेस्नी एक मत खालं अहिर आन खानेदस या सबदवर एकमत दखाडेल नै. तठेतरी आपूनले एकमत दखाडानी गरज से! तो खानदेसी नै, तेन्ही बोली हाई अहिरानी नै, तीन्ही बोली हायी लेवा बोली से आसाबी झगडा इदवानेस्मान अैकाले भेटतस. येन्हासाठे तुम्ही राजना नकाशवर जाउ नका. खानदेसी बोलीना भूगोलना इचार करा . भाषाले भूगोल -हास हाई इसरु नका. या खानदेस नावना खोल खान मानं हाई बोली इसायेल से. तीन्ही बाजूले उच्चा उच्चा डोऺगर अन चौथा बाजूलेबी डोऺगर आन वाघूर नधी. सम्दा खोल खदान मा - खानेदसमां आहिर गच्ची दिनपासीन नांदी -हायनात. अहिराणी हाई अहिरेस्नी बोली. आठेच ती बोलायस . या डोगर वलांडी ती भायेर नै जायेल. आन दुसरा बोलीलेबी डोगर वलांडी अैल्याड येता नै येयेल . म्हनीसन तं आपली हाई बोली जतन व्हयेल से .आते तं इंटरनेट, रेडू, टिव्ही, आग्गाडी, इवान, येसटी येस्ना काय म्हा या आय-हानीनं काय हूई ते आपूनल्हे ठैरावनं से . त्याच फिकीरम्हा आपू सम्दा आठे जमेल सेतस . आहिरानी हाई अहिरेस्नी वाणी व्हती. तेस्न राज व्हतं . तेस्ना राज मां तेस्नी संगत मा ज्या ज्या उनात तेस्लेबी अहिराणी बोलनं पडे . तरच तेस्ना धंदापानी चाले. आते नै का आपला चाईसगांवमांबी दुकानदार सिंधी भाउ गि-हाइक साटे झकास अहिराणी बोलतस. आसच तव्हयबी घडनं. अहिरेस्नंच राज आन त्याच लोके जास्ती ! म्हनीसन उरेल समदा लसेके तेस्नीच बोली बोलेत मातर तेसना बोलामांन तेस्ना मुय बोलीनी छाप -हाईच जाये. मंग त्या लेवा -हाओत का गुजर -हाओत, मुसलमान -हाओत का वाणी -हाओत, का भिल -हाओत त्या येरमेरसंगे बोलतांना अहिराणीच बोलेत. मातर तेस्ना बोलामा तेस्नी बोलीनी छाप -हाईच जाये. आसं खानेदसभर व्हये. मंग त्या जी बोली बोलेत ती तेसनीच हूई गयी मंग ती अहिरेस्नीच नै -हायनी हाई समदास्नी बोली बनी गई खानदेसमांन -हानारास्नी समदास्नी हाई खानदेसी बोली झायी. तव्हय भायेरला या बोलीले खानदेसम्हातली बोली, खानदेसनी बोली -खानदेसी बोली म्हनीसन वयखाले लागनात. पुढे आपलाच इदवानेस्नी खानदेसी आन अहिरानी आस्या दोन बोली हा आल्लक आल्लक सेतीस आसं मांडी आपलाम्हान झगडा लाई दिधा. आन आपलं घर फोडी टाकं! ते काब्रं फोड आसी ते आते तरी समजी ल्ह्या. अहिरानी हा सबद थाईन खानदेसी हावू सबद मोठ्ठा से. खानदेस या सबदना पोटम्हा अहिराणी हाउ सबद से. अहिराणी हाई नाव जात वरथाईन पडनं तं खानदेसी हाई नाव परदेस, भूभाग वरथाईन पडेल से. मंग हाउ खानदेस जथा जथा पसरेल से तथातथाना नावखालं हाई खानदेसी वयखावायस.खानदेसीना या परदेसना परकार प्रादेशिक प्रभेद सेतस नंदूरबारी ( नंदूरबार परिसर), डांगी (डांगान परिसर), वरल्हांगी (पश्चिमे कडील ), खाल्यांगी (पूर्वे कडील), तप्तांगी( तापी नदीच्या अंगाने), डोंगरांगी( डोगराच्या अंगाने ), बागलानी (बागलान परिसरातील), दखनी (दक्षिणे कडील), घाटोयी (घाटमाथ्यावरील). या खानदेसना बाकीना भाग वरथाईन नाव पडेल प्रोदशिक प्रभेद सेतस तसाच जात वरथाईन बी खानदेसीना सामाजिक प्रभेाद पडेल सेतस. तेन्हामा आपले अहिरेस्नी अहिरानी, लेवा स्नी लेवाबोली, गुजरेस्नी गुजरी, भिलेस्नी भिली, पावरास्नी पावरी, तडवी, महाराऊ, वाणी आसा परकार सांगता येथीन. या समदा जातना लोकेस्नी तेस्ना बोलीवर या अहिरानी बोलीनी साया - छाप पडेल -हास. म्हनीसन ती बोली जर खानदेसभर बोलायस तं तिले खानदेसी म्हनीसन भायेरला लोके वयखतस समदा जाती जमातीस्ना बोलीले येन्हावरी खानदेसपन ई जायेल से आपलं जे बी से ना ऽ ते सम्दं अहिरानी बी से आन खानदेसीबी से म्हनीसन कज्या करु नका ' ती अहिरानी नै ! ती लेवा से !- आसं बी मोठा मोठा इदवानेस्ना तोंडे अैकू येस . आरे भाउस्वन ती अहिरानी नसी पन अहिरानीनी छाप पडेल खानदेसी तं से ना ? या खानदरेसन्या सम्द्या सामाजिक आन प्रोदशिक - (जातवार आन परदेसवार) प्रभेद न्या बोली - भाषा हा खानदेसी या एकच नावखालं वयखायतीस . म्हनीसन हाई खानदेसी संमेलन, हाई अहिरानी संमेलन, आसं भांडू नका तो अहिरानी से ती लेवा से आसंबी भांडू नका खानदेस बिगर अहिरानी नै आन अहिारनी बिगर खानदेस नै आन आसं भांडाम्हा अहिरानीले आझूनबी स्वतंत्र भाषाना दजाऀ भेटेल नै आन तो आसावरी भेटाउ नै. अहिराणीले स्वतंत्र भाषाना दजाऀ द्या ः - अहिरेस्नी संख्या १९०१ ना गनती म्हान मुंबई इलाखामातूनबी अहमदाबाद, कच्छ, काठीयावाड, पालमपूर या भागमां जास्तीनी से गुजरात म्हातला अहिरेस्नी बोली हाई गुजरातीथूनबी आल्लक से . ती अहिरनीले मोप नजीकनी से .आपला अहिरे लोके गनच देस भटकी उनात त्या जथाईन जथाईन भटकी उनात. तथा तथा तेस्ना बोलीनी छाप तं पडेल सेच. ती साया आपले झामलीनी पडी, संशोधन करना पडी आपला बोलीना माग भिल, पावरा,गोड कोरकू कोलाम येस्ना बोलीमानबी सापडथीन ‌ ते दखासाटे आपले संशोधन करना पडी . पुरानी राजस्थानीना अभ्यासक एल पी तेस्सीतोरी छातीठोकीसन सांगस, गुजराती आन मारवाडी हा राजस्थानीन्या बोली सेतीस आन राजस्थानी शौरसेनी म्हातून व्हयेल से . या पुस्तकमां शौरसेनीना ज्या हजारेक सबद देयेल सेतस त्या आजबी अहिरानीम्हा जसाना तसा बोलाई -हायनात ( हा पुस्तकना हिंदी अनुवाद डाॅ नामवरसिंह येस्नी करेल से आन ते पुस्तक दिल्लीना वाणी प्रकाशकनी प्रकाशित करेल से ) मंग परतेक ये ले इद्यापिठ ना इदवान अहिरानी हाई मराठीनी बोली से आसं काब्र घडी घडी सांगतस? एकदाव म्हनी टाकाना, अहिरानी हाई स्वतंत्र बोली से आन तीले गोमंतकी, कोकणी सारका सवतंतरं भाषाना दजाऀ दी टाका ! तीलेच मोठ रुप देनं आसी आन समदास्ले समामाई ल्हेनं आसी तं समदास्ले समाई ल्हेनारं नांव खानदेसी हाई मोठ नाव द्या ! आन द्या खानदेसी बोलीले स्वतंत्र भाषाना दजाऀ.! समदा एक व्हा .आल्लंक आल्लक चुल्हा मांडू नका. कोकणीले स्वतंत्र भाषाना दजाऀ भेटस, गोमंतकीले भेटस मंग आपूनच काय घेाडं मारं? मूठभर लोके बोलतस तीले स्वतंत्र भाषाना दजाऀ भेटस.आन आपू तं साठेक लाख ना बी वर ( आते दोन कोटी ना वर ) लोके हाई बोली बोलतस तरी तीन्हा इचार व्हत नै ! कोकणीले , गोमंतकीले जो कस लावा ज्या नियम लावात त्या आम्हले लावा, कस लाई दखा. आन द्या स्वतंत्र भाषाना दजाऀ ! पन ठैरावासाटे खानदेसी भाउलेबी इचारा‌ आम्हीबी जव्हय, अहिरानीले स्वतंत्र भाषाना दरजा द्या आस म्हनतस, तव्हय आपलं बी एक काम से. जनगनना गनतीना वखत आम्हीबी मातृभषाना खानामान मराठी लिखू नका तठे अहिरानी नैतं खानदेसी लिखा तेबी इैराई ल्ह्या खानरदेसी लिखानं का अहिरानी लिखानं ते ! तुम्ही अहिरानीच बोला, अहिरानीच लिखा. हाई सम्दं तुम्ही अहिरानीसाठे करी -हास्यात तं संमेलनना पसाराले किंमत -हाई. नै तं येले बी दर वरीसना रतना जत्रा सारकं रुप ई जाई! आठे खानदेसना सातपुडा, संह्याद्री, चांदवडना उंचीना मान्से स्टेजवर आन खाले बठेल सेत सांगावा तेसनी बी की आम्ही मांघतस अहिरानी भाषाले स्वतंद्ध भाषाना दजाऀ ! मंग तुम्ही इद्यापिठमा स्वतंत्र अहिरानी नं अध्यासन मांघा ! इद्यापिठना भरवासावर -हाउ नका ः- तुम्हले काही अहिरनी मायसाटे करनं हूई तं इद्यापिठना भरवासावर -हाउ नका करासाटे करनारले कोन्तीच आडचिन नै -हास. आम्हना सटानाना देवरेभाउ बडोदाथाईन अहिरानीना अंक काढतस मी तं नागपूरथाईन सम्दं काम कय!, सूर्यवंशी,, सहस्त्रबुद्धे यास्नी पुनाथईन काम कय , करंकायताई, नारखेडे ताईनी आठेच कय! विजया सोनार ताईनी सवताच कय, मन्हा समदा पुस्तके बी मी घर बठीच कयात. आम्हनं कोन्हंच सवतंतरं इद्यापिट आन सवतंतरं अध्यासन साटे काईबी आडनं नै. आख्खी हायाती रडत बठामा काय फायदा से ? ज्या करी -हायनात तेस्न कवतीक करा! तुम्हनं इद्यापिटमा काई चालत आसी तं तेस्ना काम नी दखल ल्हा. करेल कामना गुन आवगुन दखा. तेन्हावर खलबत करा. चांगलाले चांगलं म्हना . काही कमी जास्त आसी तं तेन्हावर बी बोला . ते चुकायनं आसीे कमी पडनं आयसी तं तेबी दुरस्त कराले लावा. नुस्तं हाई तं मीबी करी -हायनू ! मी बी करनार व्हतू ! येन्हाथाईन चांगलंच करनार व्हतू ! आसं बोलीसन टाया ल्हेनं बन करा. मन्हा अहिरानीनं आसं व्हवाले जोयजे ! तसं व्हवाले जोयजेल ! पन मी काहीच करनार नै ! आते आसं बोलनं बन करा अन सवता कायतरी कराले सुरवात करा . अहिरानीले न्याय इद्यापिट भायेरनास्नीच दिधा ः- इद्यापिट आपलाच पैसासवर चालस ते आपलाच साठे से तठे जर आपला, आपली भाषाना, आपला मानसेस्ना, आपला इतिहासना, आपला भूगोलना ,आपला समाजना अभ्यास ,संशोधन व्हवालेच पाहजेल. आन तो अभ्यास जर तठे व्हनार नसी, आपलावर संसोधन व्हनार नसी तं आपुनले आपला पैसास्ना हिसाब ल्हेनाच पडी. नुस्ता मान्से पोसासाटे ते नै. तुम्ही दखा आदलोग अहिरानीले जो न्याय दिन्हा तो इद्यापिटना बाभेरना लोकेस्नीच दिन्हा. इद्यापिठना प्राध्यापकेस्नी देयेल नै. तेस्नी काम कयबी हूई तं ते फकत आपला पगारमां तीन इन्क्रिमेंट भेटापुरतं कयं . अन नान सोडी दिधा . मातर अहिरानीवर जीवतोडी मया दखाडी ती एसटी म्हातला कृष्णा पाटीलनी, टेलिफोन हापिसम्हातला सुधीर देवरेनी, सायामातला संजीवकुमार सोनवने नी , रेलवाई म्हातला अहिररावनी, वाडागुढा म्हातला वावरमा राबनारा नामदेव महाजन आन पिंगळवाडाना प्रकाश पाटीलनी, हायी यादी आसिच गच्ची लांबत जाई . मांडय , कासारं, आतेन आते हाई चाईसगांव आठली मंडई कोन्ता इद्यापिठमां जायेल व्हती ? आन कोन्ता अध्यासनमां व्हती ? आते येनपुढे आसं व्हवाले नको खानदेस आन खानदेसना भायेरना इद्यापिठेस्मा काम करनारा पा्रध्यापकेस्नी आनुदान ल्हीसन काम कय, पो-हेस्ले काम दिधं, तं गच्ची काम हूई तेसले विद्यापठनं आनुदान भेाटस, तेस्ले लिखाले ,वाचाले गच्ची ये -हास, तेस्नापान पुस्तके -हातस, बठाले आल्लक जागाबी -हास आपला सारकी तेस्नी पाटी कोरीबी नै -हास बाकीनास्ले आपली लाईन सोडी जास्तीना अभयास करना पडस, पुस्तके नै -हातस, बठाले जागा बी नै -हास, आन बाकी कामेस्मा ये बी नै -हास . तेस्ले आपलं हातनं काम सोडी ते काम करना पडस ! पधरमोड बी करना पडस . इद्यापिठ बायेरनास्ले मोठी तकलीप खाले हाई सम्दं काम करना पडस . आन ते त्या आपली माय वरल्हं प्रेम, आपली हौस म्हनीसन मोठा गोडी खालं, आलोखी खाल करतस. देखा गड््यासहोन जेस्ले अहिरानी मायनी कीव येस त्या तं तीनसाटे धाईच -हायनात. पैसा नै, आनुदान नै, इद्यापिठ नै, अध्यासन नै आसं कधी रडत बठना नैत आन माले सांगा पैसा नैत म्हनीसन कोन्ही आप्ली माय थेाडीच सोडी देस ? तुम्हले बठास्लेबी अहिरानीसाटे काम करता ई ऽऽः- खानदेसमां मोठा मोठा कारखाना सेतस, माठमोठ््या शिक्षण संस्था सेतीस तेस्नीबी नुस्ता दरवरीसले पाच हाजारबी अहिरानीसाठे खर्च कराना म्हनतात तरी परतेकना एक एक प्रकल्प दरवरीले पूरा हूई आन येले जर इदवान मंडईस्नी सात दीन्ही तं ते काम आन्खीबी कसदर हूई गाव- गल्लीमान पडेल हिरास्ले पैलू पाडता ईथीन तेस्लेबी काम देता ई आवढूसी मदत वरी तेस्लेबी काम कराले हूरुप ई आवढ तं कराच येन्सोबत एक दोन दिवयीस्ले आपला आहिरनीना दिवाई अंक तं गाजाडा !काम करा सारकं गच्ची से दिवाई, आखजी, कानबाई , गवराई, लगीन, सनवार, येस्ना गाना, जमा कराना, तेस्नी चिरफाड करानी,हाई बी मोठ्ठं काम से आह्ना, म्हनी, उखाना,चांगलं वांगलं दुव्वाड लखने येस्नाबी आभयास करता ई कुनबीना पानीना आंदाज ल्हेवाना, पाखरुना वागाना वरथून, वारा कथाना येस येन्हावरथून, कावयाना काडी ल्हेवा वरथून, खोपा कितला उच्चवार भांदा येन वरथून,आसा गंजच पूर्व अंदाज त्या सांगतस ते आपलं धन से तेबी जमा व्हवाले पाहजे जपाले पाहजे ते तेस्न शास्तर से ते अभयासनं पडी तेस्ना आंदाज या हावामान खाताना आंदाज सारका चुकत नै खानेदस मातला बोलीस्ना अभयास म्हन्जे खानदेसना संस्कृतीना अभयास जातीस्ना , संस्कृतीना अभयास ! तोबी करना पडी खानदेसना परतेक गोटना अभयास करना पडी आपला गाव बदलापूर हाई पुस्तक बी पैल्हे पांचटपना वाटे ! तेन्ही किंमत आते सेशोधकेस्ले कयस चाइसगांवनं भूसन दै रघूनंदन ना तालुका पिरसर विशेष अंक सारका अंक परतेक तालुकामा निंघाले जोयजेत आपला भागनं हाई लिखेल बरोबर से का तेबी दखाले पाह्यजेल डाॅ शंकर आन्ना साळीनी आपला पाटनानं कवतीक कय मातर बहूलवाड, नागद मां सापडेल तांबाना पत्रासवरल्हा लेख वाची आजूबाजूना गावे सोडी दिधात आन भल्तीकडे तानत बठनात ( बहूलवाड ना ताम्रपटमां मयूरखंडी, निंबस्थळी,बहूलवार, वरग्राम, वारीखेर हा गावे आन नागदना ताम्रपटमां कायावतार, सुश्चिराखोलो, नाcदbरपूर, प्राक्तंगरा या समदा गावे आजबी आजूबाजूले सेतस) भायेरना आन घरनास्नीबी अहिरानीन चूकीना अर्थ मांडात - जसा बायी येनं, नाटी, खेाय, लवने, मायबापेस्नीमाले, देवपह, आसी यादी हाई वाढतच जाई ते चूक जे लिखं ते आपू खपाडी ल्हीउ नै भाषा हाई एक जीत्ती संस्था से ः- परतेक भाषा हाई एक जीत्ती संस्था -हास. ती बदलत -हास म्हनीसन ती टिकेल से . तीन्हामां बाकी सबद येतस त्याबी अहिरानी बनी जातस. काही सबद बाद व्हतस. काही सबद धाक्ला व्हतस. तं काही मोठाबी व्हतस . काही बसद बाकी दोन्ही भाषास्ना मिसनबी व्हतस. जसा टायमोटाईम, ये वखत, आईन टाईम, पावरबाज, मोटर अड्डा,इ काही सबद कानडी, फारसी, उदूऀ पोतूऀगीज, येस्ना म्हातीनबी अहिरानीमां येयेल सेतस. महनीसन आमूकना पुस्तकमां लिखेल तो सबद चूक से, तेन्हं पूरं कामच चूक से, आसं तुम्हनं म्हननबी चूकच से हाई समजी ल्हा तुम्ही हायातीमां कामच कय नै म्हनीसन तुम्ही सदा बराबर सेत ? आन काम करनारा सदा चूक से ? आसं बी करु नका, काम करनारनीबी किंमत करा तुम्हले फुर्सत से, इद्यापिठन्या सवलती सेतीस, तं कराना थोडं दमदार काम ! तेन्ही थेाडं कय आसी तुम्ही जास्तीनं करा आपली कजा मान अहिरानीनी दैना होउŠ देवू नका दोन भाउस्ना कज्यामान तेन्ही कमी जीव लावा आन मी जास्तीना जीव लावा, आसं म्हनीसन अहिरानी मायनी दैना होउ देवू नका अहिरानीनी दैना आते थांबाडा ः- अहिरानीनी दैना व्हवानंबी एक कारन से अहिरानीन लिखनारेस्ल्ो राज्यस्तरवर पुरस्कार नैत अहिरानी साहित्यले अभयासना पुस्तकेस्मा जागा नै तीले राजाश्रय नै, राजाश्रय नै ते नै पन समाजाश्रय बी नै नवा पुस्तके कोन्ही छापत नै, छापाले मदतबी करतस नैत, जो लिखस तेन्हं कोन्ही छापत नै, जो छापस तेन्हे कोन्ही इकत ल्हेत नै येनसाठे पुस्तकेस्ले छापाले मदत करा, इकाले मदत करा, त्या इकत ल्ह्या, ल्हेवाले सांगा, तेस्ले पुरस्कार द्या तरच लिखनारेस्ले हूबारी ई आन नवा नवा लोके लिखले लागथीन बरं हाई सम्दं करता करता अहिरानी, खानदेसी आसा तुकडाबी पाडाले नकोत बठठा खानेदसनी एक खानदेस परिसद बनाडा, तीन्हामान बोली, साहित्य दोन्हीस्ले सारका न्याव द्या खानदेसना हिरास्ले कसा पैलू पाडता इथीन, कसं तेज आनता ई हाई तेस्नी सम्दं दखवा पुढे या अहिरानी कलागुण दर्शनना मंडईनी जे काम कयं ते नीत सुरु ठेवा आसीबी इनंती मी तेस्ले करस माले वाटस हाई सम्दांस्ले एक करानं कसब चाईसगांववालास्मान जास्तीनच से आपला एक एक गावमांन चार चार पारट््या -हातीस, चार चार तुकडा -हातस. या आठे तं एक नै दोन नै पुरा चाईस गावे तेसनी एकच पोटमांन समाई ल्हीदात. आन आवढा ऐकोपाबी ठेयेल से. तो खरच कवती करा सारका से. तेस्नी सम्दास्ले गुनदोस समद पोटमा घाली ल्हीदं. आवढं मोठ्ंठ संमेलन घडाई आनं. माले बी संधी दिधी. तेस्ना मी समदास्ना आभार मानस् आन मन्हा धाक्ला तोंडे काही बरं वाईट मन दुखाडा सारकं बोलाई गयं हूई ते सवाऀस्नी माफी मांघस आन मन्हं हाई लांबेल भाषन आठेच थांबाडस जय हिंद Like Comment Share 0 comments Write a comment…












17 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Comments


bottom of page