Dr Ramesh Suryawanshi
आधी बोली मग प्रमाणभाषा
डाॅ रमेश सुर्यवंशी सरांनी लोकसाहित्य आणि बोली भाषा संवर्धन साठी सुरु केली वेबसाईट आणि अप्लिकेशन यावेळी त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त केल.
माझ्या या संकेतस्थळावर आणि अप्लिकेशन आपले स्वागत आहे.
" अभ्यासिका"
अहिराणी ही महाराष्ट्राची एक मोठी बोली आहे. प्रादेशिक नावाने खानदेशी बोली म्हणून ही अहिराणी बोली ओळखली जाते. या बोलीच्या समग्र अभ्यासाचे, संशोधनाची मांडणी करण्याचे भाग्य मला लाभले आहे.. या माझ्या एकूण अभ्यासात आणि संशोधनात बोलीचा, भाषा भाषा वैज्ञानिक अभ्यास, बोलीचे सुलभ व्याकरण, बोलीचा शब्दकोश, बोलीत आढळणाऱ्या म्हणी आणि वाक्प्रचार, या बोलीतील बारा बलुतेदारांची असणारे अवजारांची नावे , कृषीशी संबंधित आणि बारा बलतेदारांशी संबंधित अवजारांचा सचित्र कोश, म्हणी आणि वाक्प्रचार यांचे संकलन आणि वर्गीकरण अशा समग्र अभ्यासाचा समावेश आहे. याशिवाय शिक्षक ,अभ्यासक आणि समाजाचा एक घटक या नात्याने समाजातील साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमात सहभाग तर आहेच ,शिवाय अजिंठा डोंगर रांगेत वास्तव्यात असलेल्या भिल्ल आणि ठाकर या आदिवासी जमातीला सामाजिक आणि शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी गेली 30 वर्ष प्रत्यक्ष कृती. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतरही त्यांच्या अस्तित्वाची दखल शासनाने घेतलेली नव्हती व त्यांना जात प्रमाणपत्र ही दिलेली नव्हती ती दखल घेण्यास भाग पाडण्याचे काम आणि जातीचे प्रमाणपत्र मिळवून व्हॅलिडीटी मिळवून देण्याचे काम या 1985 ते 2018 या काळात घडले. संशोधन विविध लेख आणि पुस्तकाचे प्रकाशन हेही केले आहे.आवड किंवा छंद म्हणाल तर भटकंती, निसर्गभ्रमण, बोली वरील संशोधन, संकलन, आदिवासी च्या जीवनाचा अभ्यास आणि किरकोळ तांत्रिक दुरुस्ती. धन्यवाद !
Comentarios