top of page

बोली आणि प्रमाणभाषा खान्देश

लोकसाहित्य आणि अभ्यास विषय

अजिठ्याचे डोंगर-पर्यटन गौताळा घाट वन्यजीव अभयारण्य कालीमठ, पितळखोरा,पाटणा    
अजिंठ्याच्या डोंगर पर्यटन गवताळा :---ऑटरमघाट अभयारण्य , कालीमठ, पितळखोरा पाटणादेवी --- हे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांचं पर्यटनाशी संबंधित 2018 मध्ये प्रकाशित झालेली छोटी रंगीत सचित्र अशी पुस्तिका. तुम्ही अनेक वेळा गवताळा पाहिला असेल पण डॉक्टर सूर्यवंशी यांच्या नजरेतून पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे. या पुस्तकात विस्ताराने माहिती दिलीच आहे . हा परिसर सगळा पर्यटनाच्या नकाशावर यावा म्हणून लेखकाची सततची धडपड आहे .या पुस्तिकेत मुख्य रस्ते कसे आहेत. रस्ता कुठे कुठे नेऊ शकतो, स्थानिकाची मदत कोणाकडून मिळू शकेल , त्यांचे संपर्क, भेटीसाठी योग्य काळ कोणता, या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे कोणती , ही सगळी अद्यावत माहिती नकाशासह, मार्गांसह त्यांनी या पुस्तकातून मांडली आहे. या परिसराचे ऐतिहासिक मूल्य काय ? गवताळा अभयारण्य म्हणजे नेमकं काय आहे . तिथला चंदन नाला , तिथले हू्यु पॉईंट रूहि तलाव , जुना मारुती , दर्गा, गौतम ऋषि आश्रम, सीता न्हानी, समोर असलेल्या संपूर्ण डोंगर कोरून तयार केलेल्या 30 फूट लांबीच्या सात फूट रुंदीच्या मोठमोठ्या पायऱ्या, डोंगर उतरत असताना वरचा बुरुज खाली, भिलदरित दिसणारा बुरूज त्याबरोबर असलेले मोठे पाण्याचे टाके, सीताखोरी धबधबा, तिथलं माहिती केंद्र, हे सर्व सर्व सचित्र असं या पुस्तकात आहे .पशु पक्षी, जैविक विविधता, यांची माहिती, अंबाडी धरण तेथली नर्सरी , त्या नर्सरी विषयी माहिती, पुढे कालीमठ त्याविषयीची माहिती त्या पुढे गेल्यानंतर आम्हाला आदिवासींची ठाकरवाडी ठाकर वस्ती त्याविषयीची माहिती, पुढे पितळखोरा ह्यू पॉईंट ,संपूर्ण खोऱ्यातल्या लेण्यांची माहिती आणि लेण्या उतरून खाली गेल्यानंतर पाटणादेवी ची माहिती या भटकंतीसाठी आपल्याला जायचं असेल तर ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त अशी आहे. पाटणादेवी ला उतरत असताना केदारेश्वर किंवा मद्रासी बाबा केदारनाथ, धवल तीर्थ धबधबा, केला-या धबधबा, तेथील पदमेश्वर महादेव /महेश्वर मंदिर .. या सर्वांची उत्तम माहिती आपणास हवी असेल तरीही पुस्तिका उपयुक्त. सर्व चित्र रंगीत आहेत. पुस्तिका आटऀ पेपरवर छापलेली आहे .अर्थात त्यामुळे जरी 50 पानांची पुस्तिका असली तरी मूल्य हे 120 रुपये आहे. आपणाला घरपोच हवा असल्यास आपण संपर्क साधावा व्हाट्सअप वर आपला फोन नंबर संपूर्ण पत्ता आणि पैसे पाठवल्याची नोंद पाठवा पुस्तक घरपोच मिळेल धन्यवाद संपर्क क्रमांक 84 46 43 22 18 किंवा 94 21 43 22 18.

अजिठ्याचे डोंगर-पर्यटन
अजिंठा डोगरातील किल्ले
(अंतुर,सुतोडा,वेताळवाडी,जंजाळा,लोजा,पेडक्या)

शरणागत : प्रपत्ती

प्रांजल

कन्नड तालुका दर्शन  - संपादित

अप्पासाहेब नागदकर     जीवन आणि कार्य

  • Facebook
  • LinkedIn
  • Blogger
  • YouTube

+918446432218 +919421432218

+912435299218

Abhyasika,1,Sidhartha Colony, Kannad,

Dist.Chatrapati Sambhaji Nagar 

( Maharashtra) India pin 431103

©2022 by rameshsuryawanshi.com Created by Samadhan Sonwane

bottom of page